नागपूर शहरातील मध्यमवर्गीय नोकरीत कार्यरत महिलांचे उत्पन्न आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेचा अध्ययन
DOI:
https://doi.org/10.64751/Keywords:
मध्यमवर्गीय महिला, उत्पन्न, जोखीम सहनशीलता, गुंतवणूक निर्णय, नागपूर, बचत, नोकरीत कार्यरत महिला, जोखीम क्षमताAbstract
सदर संशोधन पत्रिका नागपूर शहरातील मध्यमवर्गीय नोकरीत कार्यरत महिलांच्या उत्पन्नाची पातळी आणि त्यांच्या आर्थिक जोखीम घेण्याच्या क्षमतेचे विश्लेषण करते. आर्थिक समावेशन आणि महिला सक्षमीकरण या दोन महत्त्वाच्या घटकांच्या अनुषंगाने हे अध्ययन करण्यात आले आहे. नागपूर शहरात विविध सरकारी व खाजगी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मध्यमवर्गीय महिलांचे उत्पन्न, त्यांची बचत क्षमता, गुंतवणुकीचे निर्णय, आणि जोखीम सहनशीलता यांचे मोजमाप करण्यासाठी प्राथमिक व द्वितीयक डेटाचा वापर करण्यात आला आहे. संशोधनात एकूण १५० महिला प्रतिसादकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्याशी संरचित प्रश्नावलीद्वारे माहिती संकलित केली गेली. अध्ययनाचे निष्कर्ष असे दर्शवतात की उत्पन्नाची पातळी जशी वाढते, तशी महिलांची जोखीम घेण्याची क्षमता वाढते. तसेच शैक्षणिक पात्रता, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वय आणि कामाचा अनुभव हे घटक जोखीम सहनशीलतेवर महत्त्वाचा प्रभाव टाकतात. हे संशोधन आर्थिक नियोजन, महिला कल्याण योजना आणि गुंतवणूक सल्ल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान देते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






